कोणतीही पूर्वसूचना न देता तीन सव्‍‌र्हिस सेंटर्स चालकांची सेवा बंद करणाऱ्या एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीविरोधात शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र सव्‍‌र्हिस सेंटरतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला. स्थानीय लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष गजानन कीíतकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई येथील सर्विस सेंटर्स चालकांनी कंपनीची सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर कंपनीच्या चांदिवली येथील मुख्यालयासमोर महाराष्ट्र सव्‍‌र्हिस सेंटर सेनेतर्फे मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र सव्‍‌र्हिस सेंटर सेनेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या पश्चिम विभागाचे विभागीय व्यवस्थापक (सेवा) एन. तवामनी, मुंबईचे विभागीय व्यवस्थापक (सेवा) प्रफुल्ल करकेरा यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे मागण्या मांडल्या. गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखालीस शिष्टमंडळात उपविभागप्रमुख एकनाथ घाग, राजू परब, सोमनाथ सांगळे, महाराष्ट्र सव्‍‌र्हिस सेंटर सेनेचे कार्यकारी अध्यक्ष सतीश हिंदळेकर, सरचिटणीस विलास म्हाडदळकर, हर्षां चेंदवणकर आदींचा समावेश होता. कॉल रेटमध्ये सुधारणा करणे, खोटय़ा व जीव्हीसी नकाराच्या कॉलबद्दल निर्णय घेणे, सुट्टय़ा भागांच्या वाहतूक खर्चाच्या बिलाप्रमाणे मोबदला द्यावा, सुट्टय़ा भागांच्या विक्रीवरील नफ्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करावी, कायदेशीर व योग्य करारपत्रे करावे आदी मागण्याही करण्यात आल्या. याबाबत कंपनीकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे कीर्तिकर यांनी
सांगितले.

Story img Loader