शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला असून हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी जमा केलेत असा आरोप संजय राऊतांनी केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार असून महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत अशा शब्दांत टीका केली. तसंच त्यांना चोर आणि लफंगादेखील म्हटलं.

फडणवीसांच्या नावाने किरीट सोमय्यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी ४३३ बोगस लोकांना घुसवलं, प्रत्येकी २५ लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या करत व त्यांच्या तसंच अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा २०० ते ३०० कोटींचा घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.

sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, “राहुल गांधी संविधान बचाओच्या घोषणा करतात पण त्यांच्या हातातल्या लाल पुस्तकात..”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

सोमय्या भर पत्रकार परिषदेत चप्पल उचलत म्हणाले, “मी संजय राऊत यांना माझा जोडा…”

“किरीट सोमय्यांनी फक्त ईडीच्या नावे नव्हे तर फडणवीसांच्या नावेदेखील वसुली केली आहे. त्यांनी फडणवीसांना ५० कोटी देणार असल्याचं सांगितलं होतं,” असा आरोप संजय राऊतांनी केला. “आपल्या मागे काय चाललंय हे फडणवीसांना माहित नसावं. असे घोटाळे फडणवीस करतील असं मला वाटत नाही. पण त्यांच्या नावे हा घोटाळा करण्यात आला असून संबंधित सर्व कागदपत्रे मी तपास संस्थांना दिली आहेत. आता मुख्यमंत्र्यांनाही भेटून या सगळ्या प्रकाराची माहिती देणार आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

…मान्य करा अन्यथा मी ‘त्या’ ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा

“मी जुहूबद्दल सांगितलेल्या प्लॉटची माहिती समोर येईल. पवईतील अनेक लोक माझ्याकडे आले आहेत. किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वत:लाच मारणार आहे. महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत,” असं संजय राऊत म्हणाले. “चंद्रकांत पाटील वैगेरे भाजपाचे काही नेते मधे पडत आहेत. पण त्यांनी मधे पडू नये अन्यथा उघडे पडतील. उगाच या प्रकरणात पडू नका. लोक सोमय्यांची धिंड काढणार असून त्यात तुम्ही सहभागी झालात तर लोक तुमचेही कपडे काढतील,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

“महाराष्ट्रात लूट सुरु आहे आणि आम्हाला सांगत आहे. आता मी रोज भ्रष्ट्राचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे. लोकं समोरुन येऊन माहिती देत असून किरीट सोमय्यांची एकूण २११ प्रकरणं समोर आली आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी जमा केलेत,” असा आरोप संजय राऊतांनी केला. किरीट सोमय्या दलाल, चोर आणि लफंगा असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

सोमय्यांनी १०० कोटींचा प्लॉट मातीमोल भावाने विकत घेत १५ कोटी ईडीच्या अधिकाऱ्याला दिले; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

“किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे कोट्यवधी रुपये जमा केले असून हे रेकॉर्डवर आहे. जे करायचं ते करा. जो उखाडना है उखाडलो,” असं संजय राऊत म्हणाले.

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

“विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे मागच्या सरकारमधील महाआयटी घोटाळ्याच्या आरोपींना पळवून लावलं गेलं आहे. केंद्र सरकारला आम्ही अमोल काळे व इतर कुठे आहेत याबाबत विचारणा करु. २५ हजार कोटींचा घोटाळा आहे. त्याचं मनी लाँण्ड्रिंग झालं आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.