एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत. आमच्यात अजिबात नाराजी नाही असा दावा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि आपल्यात बोलणं झालं असल्याची माहितीदेखील संजय राऊतांनी दिली असून त्यांनी कोणतीही मागणी केली नसल्याचं मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. शिंदेंचा बंड घरातला विषय आहे असं सांगताना संजय राऊत यांनी भाजपा प्रवेशाचा दावा फेटाळून लावला.

“शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

Eknath Shinde Live Updates : सगळे लोक स्वगृही परततील याची आम्हाला खात्री- संजय राऊत

“राज्यपालांना करोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात. उगाच जास्त उतावीळपणा नको. एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परततील याची आम्हाला खात्री आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा आमच्या घरातील विषय आहे. सर्व लोक पुन्हा आपल्या घरी येतील. एकनाथ शिंदे आणि इतर सहकाऱ्यांशी व्यवस्थित संवाद सुरु आहे”.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आमदार नाराज असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊतांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. “त्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत. असं कोणत्याही आमदाराने म्हटलं असेल असं मला वाटत नाही,” असं ते म्हणाले.

‘काँग्रेसचेही काही आमदार आमच्या संपर्कात’; बच्चू कडू यांच्या दाव्याने खळबळ

“आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेंसोबत बोलणं झालं आहे. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरु आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचंच कार्य केलं आहे. त्यांच्याशिवायी आमच्या मनात कायम आदर आहे. चर्चा, संवाद सुरुच असतात. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेबद्दल मी उद्धव ठाकरेंनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय असं वाटत असेल तर तसं नाही. बाहेर असणारे सर्वजण शिवसैनिक असून त्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे. काही गैरसमजातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर केल्या जातील,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

भाजपासोबत सरकार स्थापन करण्याच्या मागणीवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मला असं वाटत नाही. भाजपाला जर ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असं वाटत असेल तर शिवसेनेत राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. याआधी अनेकदा शिवसेनेने राखेतून उठून गरुडझेप घेतली आहे. हा गेल्या ५६ वर्षांचा इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे आमचे मित्र, सहकारी हे अत्यंत जीवाभावाचे असून सकारात्मक चर्चा सुरु आहे”.

“पक्ष सोडणं त्यांच्यासाठी सोप्पं नसून नसून आम्हालाही नाही. आमच्यात चर्चा सुरु आहे. आज सकाळी आम्ही एक तास चर्चा केली. त्याबद्दल पक्ष प्रमुखांना सांगितलं आहे. पुन्हा एकदा चर्चा होईल. इतर आमदारांसोबतही चर्चा सुरु आहे. सर्वजण शिवसेनेत आहेत,” असा दावा संजय राऊतांनी केला.

“ठाणे, कल्याण पालिका निवडणूक नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात आली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं. एकनाथ शिंदेंची पक्षातील कोणावरच नाराजी नाही असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. “त्यांच्या कोणत्याही मागण्या नसून काही अटी-शर्थी ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या बोलण्यातून ते शिवसेनेसोबतच राहतील आणि आयुष्यभर शिवसैनिक म्हणूनच राहतील,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं होतं त्यामुळेच एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचलल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “शिवसेना असे पाठीमागून वार करत नाही. काल आणि आज सकाळीदेखील शरद पवारांशी माझी चर्चा झाली. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल. सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे”.

काही मागण्या नसताना एकनाथ शिंदे आमदारांसहित गुवाहाटीला गेल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आसाममध्ये छान असं काझीरंगा जंगल आहे. आमदार फिरतील, पर्यटन करतील. आमदारांनी फिरलं पाहिजे, देश पाहिला पाहिजे. देश पाहिल्याने देशाची ओळख होते”.

संजय राऊत माध्यमांसमोर वेगळं आणि खासगीत वेगळं बोलतात या आरोपाबद्दल विचारलं असता संजय राऊतांनी सांगितलं की, “आता मी माध्यमांसमोर काय बोललो? सोडून द्या…प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. ते आमच्यापासून थोडे लांब आहेत, जवळ आल्यावर बोलू”.