काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची गोळ्या घालून हत्या; गेल्या ४८ तासांत दोन हत्या!

Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
Maharashtra Assembly Election rebels from all party
सर्वपक्षीय बंडखोरांचा सुळसुळाट; भाजपाला सर्वाधिक फटका, मविआ-महायुतीची रणनीती काय?
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारविरोधात विरोधक संताप व्यक्त करत असून संजय राऊत यांनीही यावरुन टीका केली आहे.

“हिंदूंना सरकारने बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे”; काश्मीरमधील हत्यासत्रानंतर मनसे नेत्याची प्रतिक्रिया

“आजही दोन लोकांची हत्या झाली आहे. लोकांना शोधून मारलं जात आहे. सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही. लोकांचं स्थलांतर आणि पलायन सुरु आहे. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे झालं असतं तर भाजपाने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे,” असंही संजय राऊतांनी म्हटलं.

परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

मोहन भागवत यांनी यापुढे प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मंदिरांसाठी संघर्ष करण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे. मोहन भागवत बरोबर बोलले. या देशात अनेक राज्यात आणि खासकरुन जम्मू काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित, तेथील नागरिक अत्यंत धोक्याखाली आहेत. घऱात, कार्यालयात घुसून त्यांना रोज मारलं जात आहे. कलम ३७० हटवल्यानंतरही परिस्थितीत काही बदल झालेला नाही”.

ज्ञानवापी प्रकरणात सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “प्रत्येक मशिदीत शिवलिंग…”

“द कश्मीर फाईल्स चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या कृपेने निर्मात्याने ४००, ५०० कोटी कमावले. पण काश्मिरी पंडितांच्या नशिबी पलायनच आहे. खरं तर आज जे पलायन सुरु आहे, हत्या सुरु आहेत त्यावर ‘कश्मीर फाईल्स २’ काढावा आणि यासाठी जबाबदार कोण हे समोर यावं,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “हे एक अत्यंत चांगलं पाऊल आहे. देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते आहेत. आधी ज्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण प्रदूषित, गढूळ झालं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अजून बिघडण्याची शक्यता वाटत आहे. घोडेबाजार महाराष्ट्रात अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. निवडणुका जिंकण्यासाठी जो पैसा आणला जात आहे त्याचा ईडीने तपास करायला व्हा. आमदारांना विकत घेण्यासाठी प्रलोभनं दाखवणारे कोण आहेत? कोटींच्या आकड्याागचे सूत्रधार कोण आहेत? याचा विचार जनतेने करणं गरजेचं आहे. सर्व पक्ष शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेत्यांना भेटत असेल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे”.