स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. दरम्यान यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मातोश्रीला म्हणजे आईला असू शकत नाही का? महाराष्ट्रात दान, धर्म करण्याची परंपरा आहे. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील. शिवसेनेत डायरी लिहिण्याची परंपरा नाही. ऐकून आम्हाला गंमत वाटली,” असं संजय राऊत म्हणाले.

“मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईचे नाव…,” किरीट सोमय्यांचं खळबळजनक ट्वीट

“देशाच्या राजकारणातील दोन किंवा तीन डायऱ्या आम्हाला माहिती आहेत. या डायरींमध्ये गुजरातपासून ते इतरांपर्यंत कोट्यावधी कोणाला मिळाले याच्या नोंदी होत्या. त्याची सीबीआय चौकशी झाली होती. तेव्हा सीबीआयने अशा डायऱ्या विश्वास ठेवण्यायोग्य नसतात असं सागितलं होतं. भाजपा नेत्यांची नावं त्यात होती, सुप्रीम कोर्टातही हे टिकलं नव्हतं. मग आमच्या लोकांचा उल्लेख करुन डायरीबद्दल का सांगितलं जात आहे?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

जाधवांच्या ‘मातोश्री’ची ईडी चौकशी करा! भाजपची मागणी

“डायरी हा पुरावा असू शकत नाही. खोट्या डायऱ्या तयार केल्या जाऊ शकतात. जर भाजपाच्या प्रेरणेने तपास यंत्रणा खोटे पुरावे, गुन्हे, खटले तयार करत असतील तर कशावरुन खोट्या डायऱ्या केल्या नाहीत. महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे, धमक्या दिल्या जात आहेत की महाग पडेल म्हणजेच खोट्या डायऱ्या तयार करु,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

“माझा भाजपाच्या कार्यपद्धतीवरच संशय आहे. ते काहीही खोटं तयर करु शकतात. बनावटं माणंस, कागदं काहीही करु शकतात. कोणत्याही थराला जाऊ शकतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली. “बिर्ला, सारडा, जैन या डायऱ्यावंर त्यांनी आधी बोलाव. ते कोट्यावधी कोणी पचवले, डायऱ्या कोणी गिळल्या यावर आधी बोलावं,” असंही ते म्हणाले.

बेळगावातील सीमा भागात राहणारे मराठी हिंदू नाहीत का?; संजय राऊतांचा मोदी सरकारला संतप्त सवाल; म्हणाले “अत्याचार…”

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आम्हीदेखील गडकरींचं कौतुक करत आहोत. भारतीय जनता पक्षामध्ये कौतुक करण्यासारखी माणसं आहेत. त्यांचं कौतुकही झालं पाहिजे. राजकारणापलीकडे काही विषय असतात. भाजपाच्या लोकांना अजित पवारांविषयी जे प्रेम आहे ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे”.

किरीट सोमय्यांचं ट्वीट –

“हद्द कर दी…यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे….वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख…जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??,” असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत मुंबईत आंदोलन –

हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. हा उल्लेख ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाबत आहे की अन्य कोणाविषयी आहे, हा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँडिरग) प्रकार असून त्याची ईडीने चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत पुढील आठवडय़ापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

करोनाकाळात ३८ मालमत्ता खरेदी करुन ३०० कोटी रुपये यशवंत जाधव यांनी मिळविले आहेत. जनतेचे लुटलेले पैसे मुंबईकर जनतेला परत मिळाले पाहिजेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut yashwant jadhav it raid matoshree bjp maharashtra government sgy