शिवसेना नेमकी कुणाची? या मुद्द्यावर निवडणूक आयोगासमोर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांकडून जोरकसपणे युक्तिवाद केला जात आहे. एकीकडे त्यासंदर्भात २० जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत अंतिम निकाल येण्याची शक्यता असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे मुंबईतलं राजकीय वाचावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. शिवसेनेनं ‘सामना’तील अग्रलेखातून नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सुनावलं आहे.

‘मगरीने बेडूक गिळावा तसा मिंधे गट…’

‘पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपाने मुंबई नगरी त्यांच्या झेंड्याने सजवली आहे. त्यात कोठे तरी मिंधे गटाने त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे व मगरीच्या जबड्यात जाताना बेडूक अखेरचे डराव डराव करीत आहे असेच चित्र दिसत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत लावलेल्या कटआऊट्समध्ये बाळासाहेबांपेक्षा भाजपा नेत्यांचे कटआऊट्स मोठे दिसत आहेत. स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिंधे यावरही मूग गिळून का बसले आहेत?’ असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
eknath shinde slams maha vikas aghadi government in kalyan
विकास विरोधी, शिवसेनेचा विचार काँग्रेसच्या दावणीला बांधलेले सरकार उलथवून टाकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

‘पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नागरी कामांचेच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मुंबईत येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या कामाचे श्रेय भलेही घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सर्व काही माहीत आहे’, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांचा दौरा पालिका निवडणुकांसाठी?

‘पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे. पंतप्रधानांच्या शुभहस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवसेनेच्या कार्यकाळात ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत व त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे’, अशा शब्दांत भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे.

PM Modi Mumbai Tour : मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट, म्हणाले…

‘यालाच मुंबईचा भाग्योदय म्हणायचे का?’

‘काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महापालिकेची व प्रचाराच्या चिपळ्या भाजपा वाजवणार. पंतप्रधान येतील व मुंबईचा कायापालट करतील असे जाहीर केले. मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून हा कायापालट केंद्राने सुरूच केला आहे. महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय असे म्हणायचे आहे काय? पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी गर्दी करण्याचे नियोजन आहे व येणाऱ्यांच्या गाडय़ा-घोडय़ांच्या पार्किंगची सोय व्हावी म्हणून कलिना येथील मुंबई विद्यापीठाची संरक्षक भिंतच तोडण्यात आली. मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली’, असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.