शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश ‘मातोश्री’ निवासस्थानावरून शिवसेनाभवनात आणण्यात आल्या, तेव्हा अनेक शिवसैनिकांना अश्रू आवरणे कठीण गेले. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींनी सर्वच जण भारावले. राज्यातील लाखो शिवसेना कार्यकर्ते आणि जनतेला अंत्यदर्शन घेता न आल्याने हे अस्थिकलश दर्शनासाठी दोन दिवस ठेवले जाणार असून २३ नोव्हेंबरला देशातील प्रमुख नद्यांमध्ये अस्थिविसर्जन केले जाणार आहे.
उध्दव ठाकरे यांनी अस्थिकलश मंगळवारी सकाळी शिवसेनाभवनमध्ये आणला, त्यावेळी शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ नेते मनोहर जोशीं, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे राज्य आणि जिल्हाप्रमुख अशा सुमारे १५० हून अधिक पदाधिकाऱ्यांना अस्थिकलश देण्यात आले. आणखी शेकडो अस्थिकलश तयार करण्यात आले असून ते देशभरात व राज्यात पाठविले जाणार आहेत. सर्वानी पुढील दोन दिवसांत दर्शन घेतल्यावर अस्थिविसर्जन होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा