शिवसेनेच्या ठाकरे गटाने देशातील बुडीत कर्जाच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “देशात २०१४ नंतर नऊ वर्षात कर्जबुडव्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. तब्बल साडेतीन लाख कोटींपर्यत वाढलेला बुडीत कर्जाचा भार त्याचाच पुरावा आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं. तसेच मोदी सरकार जगातील तिसन्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेच्या , पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नांचे फुगे हवेत सोडत आहे आणि देशाची अर्थव्यवस्था वाढत्या बुडीत कर्जाचे चटके सहन करीत आहे, अशी टीकाही केली. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात ही भूमिका मांडण्यात आली.

ठाकरे गटाने म्हटलं, “केंद्रातील सरकार आर्थिक प्रगतीचे कितीही दावे करीत असले, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. सरकारी आणि खासगी बँकांच्या या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांमधून ही बाब पुन्हा समोर आली आहे. या निकालांमध्ये बँकांचा नफा वाढलेला दिसत असला तरी बुडीत कर्ज आणि कर्जबुडवे यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नफावाढीचे समाधान व्यक्त करायचे की बुडीत कर्ज वाढल्याची चिंता करायची, असा पेच सरकारी बँकांसमोर निर्माण झाला आहे.”

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”

“बुडीत कर्जाच्या गळफासाने अनेक सरकारी बँकांचा श्वास कोंडला”

“बँकांच्या बुडीत कर्जामध्ये २०२२-२३ मध्ये तब्बल ५० हजार कोटींची भर पडल्याने बुडीत कर्जाचा आकडा साडेतीन लाख कोटींवर गेला आहे. बुडीत कर्ज ही सरकारी बँकांची जुनीच डोकेदुखी आहे. मात्र मागील काही वर्षात ही डोकेदुखी जास्तच वाढली आहे. प्रामुख्याने गेल्या आठ-नऊ वर्षांत बुडीत कर्जाच्या गळफासाने अनेक सरकारी बँकांचा श्वास कोंडला आहे. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या अनेकांनी मोठ्या बँकांना हजारो कोटींचा चुना लावून केंद्रीय यंत्रणांच्या डोळ्यांदेखत देशाबाहेर पोबारा केला तो याच काळात. त्यांना भारतात आणण्याचे फुगे केंद्र सरकार अधूनमधून हवेत सोडत असते, परंतु ते हवेतच फुटतात,” अशी टीका ठाकरे गटाने केली.

“हजारो कोटींचा ढेकर देत परदेशात आराम करणारे कर्जबुडवे मजेत”

ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “विजय मल्ल्याचे ब्रिटनमधून प्रत्यार्पण झालेच, मोदी सरकारने त्याला खेचून आणलेच अशा प्रकारचे वातावरण भक्तमंडळींनी अनेकदा निर्माण केले, परंतु परदेशातील काळा पैसा भारतात आणून देशवासीयांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख देण्याच्या आश्वासनाप्रमाणेच त्याचीदेखील वासलात लागली. हजारो कोटींचा ढेकर देत परदेशात आराम करणारे कर्जबुडवे मजेत आहेत आणि मोदी सरकारचे अर्थ खाते, रिझर्व्ह बँक बुडीत कर्जावरून सरकारी, खासगी आणि नागरी सहकारी बँकांना धारेवर धरत आहे. गेल्या वर्षभरात कर्ज बुडविणाऱ्या खात्यामध्ये २ हजारांची भर पडली आहे. गंभीर बाब ही आहे की, गेल्या तीन वर्षांत या संख्येत दरवर्षी सरासरी १५ टक्क्यांनी वाढ होत आहे. मोदी सरकार २०१४ पासून सत्तेत आल्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र जनतेसमोर सातत्याने रंगवीत आहे, पण साडेतीन लाख कोटींच्या बुडीत कर्जाबद्दल मात्र सोयिस्कर मौन बाळगून आहे. सरकार उभे करीत असलेले आर्थिक विकासाचे चित्र आणि वाढत जाणारे बुडीत कर्ज यात मोठी तफावत आहे.”

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंची इच्छा होती की…”; अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले…

“नऊ वर्षात कर्जबुडव्यांना मात्र ‘अच्छे दिन’ आले”

“कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था किती भक्कम आहे हे तेथील बँकींग व्यवस्थेवर ठरत असते. बँकींग व्यवस्था मजबूत तर अर्थव्यवस्था सक्षम आणि अर्थकारण उत्तम! मात्र बँकींग व्यवस्थेला अनुत्पादित किंवा बुडीत कर्जाची वाळवी लागली असेल तर त्याचा परिणाम बँकींगसह देशाच्या संपूर्ण अर्थचक्रावर होतो. आपल्या देशातही यापेक्षा वेगळे चित्र नाही, अर्थव्यवस्थेला मागील नऊ वर्षात कर्जबुडवे आणि बुडीत कर्ज पोखरतच आहे. मागील वर्षी देशातील बँकानी सुमारे २.०९ लाख कोटीचे बुडीत कर्ज ‘निर्लेखित’ म्हणजे ‘राईट ऑफ’ केले. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर ‘राईट ऑफ’ कर्जाचा आकडा तब्बल साडेदहा लाख कोटी एवढा आहे. आता याला कोणी अर्थव्यवस्था आणि बँकींग व्यवस्थेचे सबलीकरण म्हणत असेल तर काय बोलणार? देशाच्या अर्थव्यवस्थेला २०१४ नंतर किती सुगीचे दिवस आले हा संशोधनाचा विषय होईल, परंतु या नऊ वर्षात कर्जबुडव्यांना मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत. तब्बल साडेतीन लाख कोटींपर्यत वाढलेला बुडीत कर्जाचा भार त्याचाच पुरावा आहे. मोदी सरकार जगातील तिसन्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नांचे फुगे हवेत सोडत आहे आणि देशाची अर्थव्यवस्था वाढत्या बुडीत कर्जाचे चटके सहन करीत आहे,” असा आरोप ठाकरे गटाने केला.

Story img Loader