“महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नीतिमत्तेची घसरण झाली आहे,” असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. तसेच मिंधे सरकार व त्यांच्या गृहमंत्र्यांची ही लक्तरे आहेत. गुजरात हे ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय आगार बनले आहे. गुजरातचा माल महाराष्ट्रात येत आहे, असाही आरोप केला. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात ही भूमिका मांडण्यात आली आहे.

ठाकरे गटाने म्हटलं, “महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. सरकारचे अस्तित्वच दिसत नसल्यामुळे महाराष्ट्र अमली पदार्थ विक्रीचा व सेवनाचा मोठा बाजार झाला आहे. नाशिक येथील अमली पदार्थाच्या ‘मॅन्ड्रेक्स’ गोळया बनविण्याचा कारखाना राजकीय आश्रयाखालीच सुरू होता व त्या कारखान्याचा म्होरक्या ललित पाटील हा ससून इस्पितळातून पळाला, पण आता मुंबई पोलिसांनी त्याला म्हणे चेन्नासेंद्रम येथून अटक केली. “मी पळालो नाही, तर मला पळविण्यात आले. योग्य वेळी मी या सगळय़ाचा भंडाफोड करीन,” असे या ललित पाटीलने अटकेनंतर सांगितले. ललित पाटीलचे ससूनमधून पलायन व आता त्याची अटक हे एक फिक्सिंग असून यामागे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील शिंदे गटाचे दोन मंत्री असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांनी केला.”

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Aditya Thackeray speaking about his criticism of the Adani Group's influence in Mumbai.
Aaditya Thackeray : “अदाणी समूह मुंबई गिळायला निघाला आहे”, आदित्य ठाकरेंचा घाणाघात

“भाजपाच्या युवा पदाधिकाऱ्याकडून पोलीस उपायुक्तांची कॉलर पकडून धक्काबुक्की”

“मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून गुंड, माफियांना मदत व्हावी यासाठी पोलीस व तुरुंग प्रशासनात हस्तक्षेप केला जातो. निवडणुकीपूर्वी ‘३०२’ च्या अनेक गुन्हेगारांना मुक्त करून त्यांचा वापर राजकारणात केला जाईल आणि त्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. खुनाच्या प्रकरणातून जामिनावर सुटलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्यावर तुरुंगातील गुन्हेगार व विद्यमान सत्ताधाऱ्यांत समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि हे महाशय कामास लागले आहेत, हे राज्यातील ताज्या घडामोडींवरून दिसते. गृहखात्याच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. पोलिसांचा वचक राज्यात राहिलेला नाही. कारण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही ‘मिंधे’ किंवा घरगडी करून ठेवले आहे. नागपुरात गृहमंत्र्यांच्या घराच्या उंबरठ्यावर भाजपाच्या युवा पदाधिकाऱ्याने पोलीस उपायुक्तांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तरी राज्याचे पोलीस महासंचालक, नागपूरचे ‘मिंधे’ पोलीस कमिशनर डोळ्यावर कातडे ओढून बसले,” असा आरोप ठाकरे गटाने केला.

“नाशकात नशेमुळे आतापर्यंत शंभरवर मुलामुलींची आत्महत्या”

ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “हे चित्र महाराष्ट्रासाठी चांगले नाही. त्यात नशेच्या व्यापाऱ्यांना राजाश्रय मिळू लागल्याने राज्याची अवस्था ‘उडत्या पंजाब’प्रमाणे होईल काय, असे जनतेला वाटू लागले आहे. बाजूच्या गुजरात राज्यातील बंदरे, विमानतळांवर हजारो कोटींचे अमली पदार्थ पकडले जात आहेत. जो माल पकडला गेला नाही, त्याला पाय फुटून तो महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रातील अनेक शहरे व जिल्हे नशेच्या विळख्यात सापडली आहेत व नशेचे ‘समृद्धी’ ठेकेदार बिनधास्त एक पिढी उद्ध्वस्त करीत आहेत. नाशिकसारखे सुसंस्कृत, सुविद्य शहर आज अशा विळख्यात अडकले आहे. नशेच्या अनेक गोळ्या, नशेचे प्रकार शाळा, कॉलेज, रस्त्यांवर, पान टपरीवर मिळत आहेत आणि चांगल्या घरांतील मुले-मुली त्या व्यसनात फसली आहेत. नशेच्या अमलाने नैराश्य येते आणि त्या अवस्थेत नाशकात आतापर्यंत शंभरवर मुलामुलींनी आत्महत्या केल्याचे समोर आले.”

हेही वाचा : “बँकांच्या बुडीत कर्जाचा आकडा साडेतीन लाख कोटींवर आणि मोदी सरकार…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल

“पोलीस ‘वर’ हप्ते देऊन त्यांच्या सध्याच्या पदांवर आले”

“‘कुत्ता गोली’ हा नशेचा भयंकर प्रकार मालेगावपासून नाशिकपर्यंत थैमान घालीत आहे. ही नशा करून अनेक मुले चोऱ्या, दरोडे, हत्या करतात. नाशिक, पुण्यात कोयता गँगने कहर माजवला आहे व त्यामागे ही कुत्ता गोलीची नशा आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या नशिबी एक बेफिकीर सरकार आल्याने राज्याच्या संस्कृतीची गाडी अशा प्रकारे उताराला लागली आहे. सोलापुरातून २० कोटींचे ड्रग्ज चार दिवसांपूर्वी पकडले. नाशिक, पुण्यात असे ड्रग्ज सापडत आहेत. मुंबई-ठाण्यातील उच्चभ्रू वस्त्या व हॉटेलांतून ड्रग्जचे सेवन वाढले आहे व ते सहज उपलब्ध होत आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांचे अपयश आहे. स्थानिक पोलिसांच्या संगनमताशिवाय नशेचा व्यापार चालू शकत नाही. पोलीस ‘वर’ हप्ते देऊन त्यांच्या सध्याच्या पदांवर आले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांची वसुली करावी लागत आहे,” असाही आरोप ठाकरे गटाने केला.

Story img Loader