राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर यानंतर अजित पवारांसह त्यांच्या गटातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर नेत्यांवर गंभीर आरोप केले. मात्र, मागील काही दिवसात अजित पवार गटाने दोनदा शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. आता त्या भेटीवर ठाकरे गटाने मंगळवारी (१८ जुलै) शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाकरे गटाने म्हटलं, “राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो, असे जगन्मान्य सत्य आहे. ते खरे होताना या महान भारतभूमीवर दिसत आहे. विठ्ठलाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना याच अड्ड्यावर प्रतिष्ठा मिळते आणि तेच बेइमान पुन्हा ‘बा पांडुरंगा, आम्हाला सांभाळून घ्या’ अशा विनवण्या करतात. बदमाशांच्या अड्ड्यावरची ही शिकवणी सर्वत्र अनैतिकतेचा चिखल करीत आहे. एकाधिकार, राज्यघटनेचे विडंबन व त्यातून निर्माण झालेली राजकीय माफियागिरी हेच भारताचे भविष्य होणार असेल, तर एक दिवस या देशाचे डबके झाल्याशिवाय राहणार नाही. चिखल सर्वत्रच आहे. तो संपवायचा कसा? बदमाशांचा शेवटचा अड्डा लोकशाही मार्गाने उद्ध्वस्त केल्याशिवाय ते शक्य होणार नाही.”
“महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपाने आता उत्तर प्रदेशात चिखल केला”
“चिखलातून कमळ उगवावेत यासाठी भारतीय जनता पक्ष जी मेहनत घेत आहे त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत. त्यासाठी ते जागोजाग चिखलच चिखल करीत आहेत. महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपाने आता उत्तर प्रदेशात चिखल केला. योगी आदित्यनाथांसारखा लोकप्रिय, भगवे वस्त्रधारी नेता तेथे मुख्यमंत्री असताना भाजपाला त्या रामभूमीतही चिखल करावा लागतोय. याचा अर्थ असा की, २०२४ मध्ये बहुमतास लागणारी २८३ ‘कमळे’ फुलणार नाहीत हीच भीती त्यांना सतावत आहे,” असा दावा ठाकरे गटाने केला.
हेही वाचा : बंडखोर गट पुन्हा पवारांच्या भेटीस, सलग दुसऱ्या दिवशी मनधरणीचा प्रयत्न
“भाजपाने कुख्यात अब्बास अन्सारींना केलं पवित्र”
ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “भारतीय समाज पार्टीचे ओमप्रकाश राजभर यांनी भारतीय जनता पक्षाशी निकाह लावला आहे. भाजपाने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना घालून धुऊन स्वच्छ केले आणि आता त्यांची पापे धुऊन निघाली. राजभर यांचा पक्षच एनडीएचा घटक बनल्याने त्या पक्षाचे आमदार कुख्यात अब्बास अन्सारी यांनाही भाजपाने ‘पवित्र’ करून घेतले आहे. हे अब्बास अन्सारी म्हणजे अनेक खून, अपहरण, खंडणी वगैरे प्रकरणांमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेले माजी खासदार मुख्तार अब्बास अन्सारी यांचे चिरंजीव.”
“भाजपाच्या चरणी लीन झाल्यामुळे अन्सारींना सवलती”
“उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील माफिया -डॉन अतिक अहमद व सिवान येथील मुख्तार अन्सारी यांना मातीत मिळविण्याचा चंग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधला होता. अतिक अहमद यांची हत्या झाली, तर अन्सारी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली. त्यांचे आमदारपुत्र अब्बास अन्सारी यांच्यावर ईडी, सीबीआय, पोलिसांच्या कारवाया सुरू आहेत. पण आता ओमप्रकाश राजभर भाजपाच्या चरणी लीन झाल्यामुळे अन्सारी यांना कोणत्या व कशा सवलती मिळतात ते पाहायला हवे,” असं ठाकरे गटाने म्हटलं.
हेही वाचा : अजित पवार गटातील नेते अस्वस्थ? सलग दोन दिवस भेटी घेण्याचं कारण काय? जयंत पाटील म्हणाले…
“…तर मी माझ्या आईबापाची औलाद नाही”
“मुख्तार अरी यांचा तेथील मुस्लीम समाजावर प्रभाव आहे. भाजपाला उत्तरेत मुसलमानांची मते हवीत आणि त्यासाठीच त्यांनी हा नवा चिखल निर्माण केला आहे. भाजपाला सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी तो कोणतीही तडजोड करायला तयार आहे. आता ओमप्रकाश राजभर भाजपाच्या तंबूत सामील झाले, पण काही महिन्यांपूर्वी हेच राजभर गरजले होते की, “प्रत्यक्ष परमेश्वराने आज्ञा केली, तरी भाजपाचा हात पकडणार नाही. मोदी व शाहांना पुन्हा कायमचे गुजरातला पाठवले नाही, तर मी माझ्या आईबापाची औलाद नाही.” तेच राजभर आज निर्लज्जपणे भाजपावासी झाले,” असंही ठाकरे गटाने नमूद केलं.