शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करत आहे. पण हे राजकारण आतापर्यंत कोणीच पाहिलेलं नाही, हे सुडाचं राजकारण आहे असा संताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी भायखळ्यातील शिवसेना शाखेत पोहोचून त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी त्यांनी पोलिसांना सर्वासमोर जाब विचारला.
पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची तक्रार यावेळी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणार नाही म्हटलं आहे, पण मग ते शिंदे सैनिक आणि उद्धव साहेबांचे सैनिक असा प्रश्नही त्यांनी विचारला.
राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या “एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असणारा…”
यावेळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारत काही वेडवाकडं काही झालं तर तुम्ही जबाबदार असणार असं सांगितलं. तसंच जिवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही दिला. शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर तुम्ही जबाबदार असणार असंही हे ते पोलिसांना म्हणाले.
“शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करत आहे. पण हे असं राजकारण आतापर्यंत कोणीच पाहिलेलं नाही. हे सुडाचं राजकारण आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. संशयितांना संरक्षण का दिलं जात आहे? शोध किती काळ सुरु राहणार आहे? अशी विचारणा त्यांनी पोलिसांना केली.
“आता मी मुख्यमंत्री आहे, कोणी वाटेला आलं तर…,” एकनाथ शिंदे यांचा जाहीर इशारा
“राज्यात आतापर्यंत अशा गोष्टी झाल्या नव्हत्या. हवं तर तुम्ही हात वर करा, शिवसैनिक आपलं रक्षण करण्यास समर्थ आहे,” असंही ते म्हणाले. कारभार करणारे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जाऊन विचारा असं आवाहनच त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.