वसई : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी शिझान खान याला शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या जामिनासाठी सोमवारी अर्ज करण्यात येणार आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या शिझान खान याच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.  त्यावेळी न्यायालयाने पोलिसांनी केलेली वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळून  त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी शिझानच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. पोलिसांनी शिझानच्या मोबाइलमध्ये संभाषण मिळवले असून त्यात काही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘लव्ह जिहाद’ची शक्यता पोलिसांनी फेटाळली. मात्र नातेसंबंधात शिझानचा हलगर्जीपणा दिसून आल्याने त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुरावे असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

सोमवारी खुलासा..

शिझानची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर त्याचे वकील शैलेंद्र शर्मा यांनी न्यायालयाकडे त्याला समुपदेशन देण्याची तसेच पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. शिझानच्या आईने केलेल्या आरमेपांचे खंडण करण्यासाठी तसेच या प्रकरम्णी गौप्यस्फोट करण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, असे सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shizan khan remanded to 14 days judicial custody actress tunisha sharma suicide case ysh
Show comments