मुंबईत मागील काही दिवसांत पावसाने अक्षरशा थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले आहेत. तर, घरांच्या भिंती पडल्याने कित्येकांचे संसार उघडले पडले आहेत. मुंबई शहरासह उपनगर भागातील रस्त्यांवर, घरांमध्ये, काही ठिकाणी मनपाच्या पार्किंगमध्ये पाणी साचल्याने मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना देखील मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मुसळधार पावसाने एका दहा वर्षीय मुलाचा देखील जीव घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात पडून एक दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना, मुंबईतील मीरा रोड परिसरातील मुंशी कंपाउंड जवळ घडली. पावसाच्या पाण्यात हा मुलगा वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मृतदेह हाती लागला असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी पहाटे  पालघर व ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार पाऊस झाला.
चेंबूरमधील न्यू भारतनगर येथे रविवारी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलींना गंभीर दुखापत झाली असून त्यापैकी एकीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. अन्य एका जखमींची प्रकृती स्थिर असली तरी कोसळलेले घर आणि हिरावून गेलेले कुटुंबीय हा आघात त्यांच्यासाठी अधिक क्लेशकारक आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking a 10 year old boy was swept away by torrential rains in mumbai msr
Show comments