पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही करोनाबाधित असून, त्यांना काही दिवसापूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

बलात्काराची ही घटना गुरुवारी रात्री घडली. यातील आरोपी आणि पीडिता या दोघांनाही करोनाचा संसर्ग झाल्यानं उपचारासाठी पनवेल जवळ असलेल्या इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

क्वारंटाइन सेंटरमध्येच हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील करोनाबाधित आणि करोना संशयितांना दाखल करण्यात येते . बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असून, आरोपी युवक हा करोनाबाधित असल्याने त्यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे.

Story img Loader