लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भायखळा येथील साखळी रोडवर असलेल्या एका दुमजली दुकानाला बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आणखी वाचा-भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीतील सामन्याबाबत ट्विटरद्वारे धमकी
साखळी रोडवर असलेल्या दुकानाला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. विद्युत तारा आगीच्या संपर्कात आल्याने आग आणखी वाढली. दुकानामध्ये असलेला माल आगीत जळून खाक झाला. विद्युत तारा आगीच्या संपर्कात आल्याने तळमजल्यावरील अनेक गाळ्यांमध्ये आग पसरली. पादत्राणे, कपडे, चामड्याच्या वस्तू आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आठ मोटार पंप आणि इतर यंत्राच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत होते. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या ४ ते ५ जणांची शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित सुटका केली.