बोरिवलीतील प्रकार; धोरण निश्चित नसल्याने कारवाई नाही
मुंबई महापालिकेचे फेरीवाल्यांविषयीचे धोरण निश्चित नसल्याचा फायदा फेरीवाल्यांबरोबरच दुकानदारही घेत असून अनेक ठिकाणी विशेषत: रेल्वे स्थानकांबाहेरील परिसरात फेरीवाल्यांना हटविण्याच्या नावाखाली दुकानदार रस्ते आणि पदपथ आपली मालमत्ता असल्याप्रमाणे काबीज करीत आहेत. फेरीवाले आपले ठेले टाकून तर दुकानदार ‘नो पार्किंग’चे अडथळे उभारून आपापल्या परीने पदपथ आणि रस्ते अडवीत आहेत. दुकानदार आणि फेरीवाले या पद्धतीने सार्वजनिक जागेवर हक्क सांगू लागल्याने सामान्य मुंबईकरांना मात्र पदपथावरून साधी चालण्याची किंवा गाडी उभी करण्याचीही ठिकठिकाणी चोरी झाली आहे.
फेरीवाले प्रवेशद्वार अडवून बसतात आणि त्याचा व्यवसायावर परिणाम होतो म्हणून आम्ही हे अडथळे टाकतो, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यासाठी कधी दुकानासमोरच्या पदपथावर बांधकाम करून तर कधी रस्त्यावरील मोकळ्या जागेत ‘नो पार्किंग’चा फलक लावून वा चक्क मोठाले लोखंडी अडथळे टाकून रस्ते अडविले जात आहेत. यामुळे फेरीवाले आणि दुकानदार असा वाद तर उद्भवतो. गेल्या काही वर्षांमध्ये दादर, मालाड पाठोपाठ पश्चिम उपनगरातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आलेल्या बोरिवलीत तर ही भांडणे कित्येकदा हाणामारीपर्यंत जातात.
शिवाय दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपापल्या परीने रस्ते आणि पदपथ अडवून ठेवल्याचा फटका पादचाऱ्यांना आणि रहदारीला बसतो. बोरिवली रेल्वे स्थानकाला समांतर असलेला स्वामी विवेकानंद मार्गावर (एस. व्ही. रोड) कायम वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. पदपथ आणि रस्ते दोन्ही फेरीवाल्यांनी अडवून ठेवल्याने पादचाऱ्यांना चालणे दुरापास्त होते, तर दुकानासमोर गाडी उभी करू पाहणाऱ्या चालकांशीही दुकानदारांचे वाद होतात. आता तर येथील दुकानदारांनी फेरीवाल्यांना मज्जाव करण्याकरिता ‘स्वच्छ मुंबई’च्या नावाखाली दुकानाबाहेर ‘नो पार्किंग’चे मोठाले लोखंडी अडथळे टाकून सार्वजनिक जागाच अडवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार केवळ बोरिवलीतच नव्हे तर शहरात सर्वत्र दिसून येतो आहे.
फेरीवाल्यांची रस्ते अडवणूक
पदपथ आणि रस्ते दोन्ही फेरीवाल्यांनी अडवून ठेवल्याने पादचाऱ्यांना चालणे दुरापास्त होते,
Written by रेश्मा शिवडेकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-05-2016 at 00:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeepers capture space at borivali station