लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : नौदल अधिकाऱ्याचे क्रेडीट कार्ड वापरून परदेशात व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्याप्रकरणी कफ परेड पोलीस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार यांचा मोबाइल हॅक करून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ola Cab
Ola Cab Driver Mastbrate : ओला ड्रायव्हरने महिला प्रवाशाकडे बघून केलं हस्तमैथून; कंपनीला थेट पाच लाखांचा दंड!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
Inspection of pit by Geological Survey Further action only after receipt of report
‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’कडून खड्ड्याची पाहणी, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
cyber crime
New Cyber Fraud: मोबाइलच्या किपॅडवर ‘शून्य’ दाबताच लाखोंचा गंडा; या सायबर स्कॅमपासून सावध व्हा
cybercriminals india post fraud marathi news
विश्लेषण: सायबर गुन्हेगारांकडून ‘पोस्टल स्कॅम’चा वापर… काय आहे हा कुरिअर फसवणुकीचा नवा प्रकार?
Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र

नौसेनत ट्रायल अधिकारी म्हणून कार्यरत असणारे ३९ वर्षांचे तक्रारदार सध्या त्यांच्या कुटुंबियांसह कफ परेड परिसरात राहतात. त्यांचे एका खाजगी बँकेत खाते असून त्या बँकेने त्यांना क्रेडिट कार्ड दिले होते. तक्रारीनुसार, या कार्डची गोपनीय माहिती त्यांनी आतापर्यंत कोणालाही सांगितली नव्हती. त्यानंतरही २१ मे रोजी त्यांच्या मोबाईलवर दोन संदेश आले. त्यात त्यांच्या क्रेडीट कार्डद्वारे खरेदी-विक्री करण्यात आली होती.

आणखी वाचा-मुंबई : ब्लॉककालीन कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प

हे सर्व व्यवहार अमेरिकन डॉलर्समध्ये करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधला असता त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून सुमारे ४६ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. त्यांनी त्यांच्या कार्डची माहिती किंवा पासवर्ड कोणालाही दिला नव्हता. तरीही त्यांच्या कार्डवरुन दोन ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे क्रेडिट कार्ड तात्पुरते बंद करण्याची विनंती केली होती. या घटनेनंतर त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर दूरध्वनी करुन तक्रार केली होती. तक्रारीनंतर त्यांनी कफ परेड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तेथेही तक्रार केली होती. हे व्यवहार झाले त्यावेळी तक्रारदार कर्तव्यावर होते. प्राथमिक तपासात मोबाइलवर नियंत्रण मिळवण्यात आले होते, असा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.