मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवर बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रिकरण संकलनाच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी वारंवार लोहमार्ग पोलिसांकडून रिसर्च डिजाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशनकडे (आरडीएसओ) करण्यात येत आहे. सीसी टीव्ही कॅमेराने टिपलेले चित्रण ३० अथवा ६० दिवसांऐवजी ९० दिवस उपलब्ध व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत मदत मिळू शकेल, असे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), तसेच पनवेल येथून मेल-एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा होत असते. दादर, ठाणे, कल्याण, पनवेल येथे मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा दिला जातो. मध्य रेल्वेवरून दररोज २०० नियमित आणि विशेष मेल – एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू असते. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस असून अंधेरी, बोरिवली, वसईत मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे. येथेही मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा होत असते. उपनगरीय स्थानकाबरोबरच मेल-एक्स्प्रेस प्रवासात तसेच टर्मिनसवरही मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे गुन्हे घडतात. गुन्ह्यांची उकल करताना सीसी टीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चित्रणाची मदत होते.

हेही वाचा: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या बँकेतील मुदतठेवी पोहचल्या ८९ हजार कोटींवर…

एखादा गुन्हेगार मेल-एक्स्प्रेस टर्मिनसमधून बाहेरगावी जाणारी गाडी पकडून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाच्या आधारे गुन्हेगारांना पकडण्यास मदत होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण महत्त्वाची भूमिका बजावते. वेगवेगळ्या दिशेला बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण मिळवून तपास करण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे काही कालावधीसाठी हे चित्रण उपलब्ध होणे गरजेचे असते. मात्र काही प्रकरणांमध्ये तसे होत नाही. सध्या सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण ६० दिवस संकलित करून ठेवता येते. तर काही सीसी टीव्हीचा चित्रण संकलन कालावधी ३० दिवस आहे. त्यानंतर हे संकलन आपोआप यंत्रणेतून रद्द होते. परिणामी एखाद्या गुन्ह्याचे चित्रण पुन्हा मिळवताना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवरील सीसी टीव्हीतील चित्रण संकलनाचा कालावधी ३० – ६० दिवसांऐवजी ९० दिवस करावा, अशी मागणी मध्य, पश्चिम रेल्वे आणि आरडीएसओकडे केल्याचे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितले. यामुळे गुन्हेगारांचा माग काढणे सोपे होईल.

हेही वाचा: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाऊदचे दोन हस्तक मारणार’; मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पनाईनवर धमकीचा मेसेज

जानेवारी ते डिसेंबर २०२१ आणि जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या वर्षात एकूण १५ हजारांहून अधिक गुन्हे घडले आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडे, विनयभंग, लहान मूल पळवून नेणे इत्यादी गुन्हे मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय, तसेच मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवर घडले आहेत.