भांडुप उदंचन केंद्रात विजेचा वापर अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी तसेच भांडुप (प.)च्या गांधीनगरजवळ जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी मुंबईतील अनेक विभागांमध्ये येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
भांडुप केंद्रामध्ये वीजवापराची कार्यक्षमता (पॉवर फॅक्टर) वाढविण्यासाठी ३.३ के.व्ही. क्षमतेचे कॅपॅसीटर्स बँक व एपीएफसी पॅनल बसविण्याचे काम २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम २७ नोव्हेंबर रोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर जेव्हीएलआर आणि एलबीएस मार्ग जंक्शन, गांधीनगरजवळ, भांडुप (प.) येथे जलवाहिनीच्या जोडणीचे कामही हाती घेण्यात येणार आहे. या दोन्ही कामांमुळे २६ नोव्हेंबर रोजी कुलाबा ते दादर, तसेच वांद्रे ते दहिसर, मुलुंड, भांडुप (पश्चिम), कांजूरमार्ग (पश्चिम), विक्रोळी (पश्चिम), घाटकोपर (पश्चिम), कुर्ला (पश्चिम) येथे २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे, तर २७ जानेवारी रोजी भांडुप (पश्चिम), कांजूरमार्ग (पश्चिम), विक्रोळी (पश्चिम), घाटकोपर (पश्चिम) या भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा