समीर कर्णुक

करोनाच्या जागतिक संकटात एकीकडे माणुसकीचे दर्शन घडत असताना दुसरीकडे अन्य आजारांनी मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाला खांदा देण्यासही कुणी येत नसल्याचे आणि मदत करण्यासही कुणी  येत नसल्याचे वास्तव अस्वस्थ करीत आहे. असाच एक प्रकार चेंबूर येथे घडला.

एका वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मात्र टाळेबंदीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करत आले नाही. इतके च नव्हे तर त्यांना खांदा देण्यासही कुणी आले नाही. त्यामुळे त्यांच्या मुलीने आणि पत्नीने खांदा देऊन अंत्यसंस्कार केले.

समीर नासकर (वय ६१) चेंबूर कॅम्प परिसरात पत्नी आणि मुलीसह राहत होते. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या पत्नीने आणि मुलीने शेजाऱ्यांकडे मदत मागितली. परंतु कोणीही मदतीला आले नाही. परिणामी, त्यांचा घरातच मृत्यू झाला. त्यांना खांदा देण्यासही कोणी आले नाही.