‘काँग्रेस दर्शन’ या मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रात पंडीत जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त मजकूर छापण्यात आल्याप्रकरणी या मासिकाचे संपादक संजय निरूपम यांना पक्षाकडून जाब विचारण्यात आला आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने निरूपम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  याप्रकरणी संजय निरूपम यांनी यापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. याशिवाय, या मासिकाच्या कंटेट एडिटर पदावरून सुधीर जोशी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. दरम्यान, ही संधी साधून निरूपम यांच्याविरोधात गुरूदास कामत गटाने उठाव केला. निरूपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठीच्या हालचालींना तेव्हापासून वेग आला होता. या पार्श्वभूमीवर निरूपम यांना बजावलेली नोटीस फार महत्त्वाची मानली जात आहे. निरूपम यांना पुढील आठ दिवसांत या नोटीशीला लेखी उत्तर द्यायचे आहे. मात्र, निरूपम यांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यास शिस्तपालन समितीकडून निरूपम यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुंबई काँग्रेसच्याच मुखपत्रामध्ये थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यात आल्यामुळे पक्षाच्या १३१व्या वर्धापनदिनीच मुंबईतील काँग्रेसचे नेते अडचणीत सापडले होते. त्यामुळे एकुणच राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर खळबळ उडाली होती. दरम्यान, संजय निरूपम यांनी याप्रकरणी सारवासारव करताना अन्य ठिकाणची माहिती कोणतीही खातरजमा न करता मासिकात छापण्यात आल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले होते.

नेहरूंनी पटेलांचे ऐकले असते तर काश्मीरचा प्रश्न उदभवलाच नसता – काँग्रेसच्या मुखपत्रात दावा

Story img Loader