‘काँग्रेस दर्शन’ या मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रात पंडीत जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त मजकूर छापण्यात आल्याप्रकरणी या मासिकाचे संपादक संजय निरूपम यांना पक्षाकडून जाब विचारण्यात आला आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने निरूपम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी संजय निरूपम यांनी यापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. याशिवाय, या मासिकाच्या कंटेट एडिटर पदावरून सुधीर जोशी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. दरम्यान, ही संधी साधून निरूपम यांच्याविरोधात गुरूदास कामत गटाने उठाव केला. निरूपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटविण्यासाठीच्या हालचालींना तेव्हापासून वेग आला होता. या पार्श्वभूमीवर निरूपम यांना बजावलेली नोटीस फार महत्त्वाची मानली जात आहे. निरूपम यांना पुढील आठ दिवसांत या नोटीशीला लेखी उत्तर द्यायचे आहे. मात्र, निरूपम यांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यास शिस्तपालन समितीकडून निरूपम यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा