मुंबई : शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी एक लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही गट या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाकरे गटाचा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मुंबई महापालिकेसमोरील आझाद मैदानावर होणार आहे. ठाकरे गटाने या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित केले असून त्यात शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी मुंबईत ठिकठिकाणी फलकबाजी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे गेली ५६ वर्ष तयार झालेले समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी शिवाजी पार्क येथे जमत होती. १६ महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून ठाकरे व शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्याच्या शिवाजी पार्क मैदानावरुन दोन्ही गटात रणकंदन माजले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान मुंबई पालिकेला देणे भाग पडले. त्यामुळे शिंदे गटाला हा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर घ्यावा लागला होता. गेल्या वर्षीची तणावपूर्व स्थिती यंदाही निर्माण झाली होती. मात्र शिंदे गटाने शिवाजी पार्क वरील आपला दावा मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मार्ग सुकर झाला असून या मेळाव्याची आठवडाभर जय्यत तयारी सुरु आहे. त्याचवेळी शिंदे गटानेही आझाद मैदान येथे मेळावा घेण्याची तयारी पूर्ण केली आहे.

हेही वाचा >>>समूह पुनर्विकासात उच्चस्तरीय समितीच्या मंजुरीविनाच ७५ मजली इमारतीस मुभा! शासनाकडूनच इमारत परवानगीत भेदभाव

या दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यातून दोन ते अडीच लाख शिवसैनिक मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. उध्दव ठाकरे हे राज्यातील दुष्काळ, बेरोजगारी, हिंदूत्व, मराठा आरक्षण,परदेश दौरे, भ्रष्टाचार या विषयांवर शिंदे गटावर तोफ डागणार आहेत तर शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र व राज्य सरकारची कामगिरी, पूर्ण केलेले प्रकल्प व योजना, दुष्काळावरील उपाययोजना, सरकार आपल्या दारी सारख्या उपक्रमांची माहिती या निमित्ताने देणार आहेत.

टीझर प्रदर्शित..

ठाकरे गटाकडून या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित झाले आहेत.गर्दी तीच,जल्लोष तोच,मैदान तेच म्हणत एकनिष्ट शिवसैनिकांच्या या मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दुसऱ्या टीझरमध्ये दसरा मेळावा हा मर्दाचा मेळावा असल्याचे सांगत शिंदे गटाला गद्दार, खोक्यांचे सरकार अशा शब्दात हिणविण्यात आले आहे.