नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. या प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत असतानाच आता श्रद्धाला यापूर्वीही आफताबने बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. श्रद्धावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे. श्रद्धाच्या खांद्याला आणि पाठीला गंभीर जखम झाली होती. २०२० साली श्रद्धा डॉक्टरांकडे उपचारांसाठी आली होती. विशेष म्हणजे यावेळेस आफताबच तिला डॉक्टरांकडे घेऊन आला होता. नालासोपाऱ्यामधील ओझोन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आली होती.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पूनावाला कुटुंबाला होती हत्येची कल्पना? १५ दिवसांपूर्वीच घर सोडताना आफताबचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाला…”

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी

श्रद्धावर त्यावेळी उपचार केलेल्या डॉक्टर शिव प्रसाद शिंदे यांनी श्रद्धासंदर्भातील माहिती एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. “श्रद्धाला ३ डिसेंबर २०२० रोजी रुग्णालयामध्ये चार दिवसांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला पाठीचा तसेच खांदेदुखीचा त्रास होता. मात्र तिला ही दुखापत नेमकी कशामुळे झाली हे मात्र श्रद्धाने सांगितलं नव्हतं,” असं डॉक्टर शिंदे म्हणाले. श्रद्धा ही आफताबरोबर रुग्णालयामध्ये आली होती, असंही डॉक्टरांनी सांगितलं. “आम्हाला तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा आफताब तिच्याबरोबर होता,” असं डॉक्टर शिंदे म्हणाले.

नक्की वाचा > Shraddha Murder Case: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे… इतकं क्रूर कृत्य करणाऱ्या आफताबबद्दल मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात, “अनेकदा अशा…”

श्रद्धाच्या नाकाला आणि उजव्या डोळ्याखाली दुखापत झाल्याने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंबरोबर माहितीमध्ये आफताबने मारहाण केल्यामुळे श्रद्धा जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. “ती आफताबबद्दल आणि त्याच्या व्यसनांबद्दल कायम तक्रार करायची. तो नेहमी तिच्याबरोबर वाद घालायचा आणि तिला मारहाणही करायचा,” असंही श्रद्धाचा मित्र राहुल राय याने एएनआयशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पोलिसांनी ‘तो’ प्रश्न विचारताच आफताब रडू लागला; ५४ हजार रुपयांमुळे झाला प्रकरणाचा उलगडा

आफताब आणि श्रद्धा यांचे २०१८ पासून नातेसंबध होते. २०१९ पासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. आफताब आणि श्रद्धा २०१९ मध्ये नायगाव येथील यशवंत प्राईड किणी कॉम्पलेक्स मध्ये पती-पत्नी असल्याचे सांगून भाडय़ाने राहत होते. येथील भाडे करार संपल्याने त्यांनी जुलै २०२० मध्ये वसईच्या एव्हरशाईन परिसरात रिगल अपार्टमेंटमध्ये पुन्हा पती-पत्नी असल्याचे सांगून सदनिका भाडय़ाने घेतली होती. या सदनिकेचा करार ऑगस्ट २०२१ मध्ये संपला या नंतर त्याने वसईत आणखी एका ठिकाणी रूम घेतली आणि त्यानंतर तो दिल्लीत राहायला गेला होता. १८ मे रोजी आफताबने लग्न करण्याच्या वादातून गळा आवळून श्रद्धाची हत्या केली होती.