‘लोकसत्ता’चे माजी उपसंपादक श्रीधर जोशी यांचे येथील राहत्या घरी शुक्रवारी पहाटे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक ह. रा. महाजनी, विद्याधर गोखले, र. ना. लाटे, माधव गडकरी यांचे स्वीय साहाय्यक म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. ते उपसंपादक म्हणून कार्यरत होते. काही वर्षे त्यांनी ‘लोकसत्ता’चे डोंबिवली प्रतिनिधी म्हणून काम केले होते.     

Story img Loader