राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य संशोधन संस्थेच्या अभ्यासातील निष्कर्ष

शैलजा तिवले, लोकसत्ता

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

मुंबई : सिकल सेलग्रस्त गर्भवतींना करोनाचा धोका अधिक असून या महिलांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य संशोधन संस्था (एनआयआरआरएच) आणि वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण संचालनालयाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. हा अभ्यास नुकताच ‘इंडियन जे हिमॅटोल ब्लड ट्रान्सफ्युझ’ या वैद्यकीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाला.

सिकल सेल हा लाल रक्तपेशींच्या गुणसूत्राशी निगडित आनुवंशिक आजार असून राज्यात विदर्भ, मराठवाडय़ात प्रामुख्याने आढळतो. जनुकीय दोषामुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे हा आजार होतो. राज्यात एप्रिल ते जानेवारी २०२१ या काळात नागपूर, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि मुंबई येथे उपचारासाठी दाखल केलेल्या १५८२ करोनाबाधित गर्भवतींचा अभ्यास करण्यात आला. सिकल सेलग्रस्त ३१ तर सिकल सेल नसलेल्या १५५१ महिलांचा यामध्ये समावेश आहे.

सिकल सेल नसलेल्या गर्भवतींच्या तुलनेत सिकल सेलग्रस्त गर्भवतींमध्ये लक्षणे असण्याचे प्रमाण अधिक आढळले असून यामध्ये तापासह वाहणारी सर्दी, अतिसार आणि अंगदुखी ही लक्षणे प्रामुख्याने दिसून आली. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याचे प्रमाणही इतर गर्भवतींच्या तुलनेत सिकल सेलग्रस्त गर्भवतींमध्ये अधिक आढळले आहे. प्रसूती काळातील उच्च रक्तदाबाचे प्रमाणही या महिलांमध्ये तुलनेने अधिक आहे.

रक्तक्षय किंवा श्वसनाचे विकार हे घटक सिकल सेलग्रस्त महिलांमध्ये करोनाचा धोका वाढण्यासाठी कारणीभूत नाहीत. करोनामुळे होणाऱ्या गुंतागुंतीमुळे या मातांमधील धोका वाढत असल्याचेही या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे.

आकडेवारी काय सांगते?

सिकल सेल नसलेल्या महिलांमध्ये नियोजित वेळेपूर्वीच प्रसूती होण्याचे प्रमाण सुमारे ४ टक्के होते, तर सिकल सेलग्रस्त गर्भवतींमध्ये हे प्रमाण सुमारे १२ टक्के आढळल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.रक्ताची तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकताही सिकल सेलग्रस्त गर्भवतींना जास्त प्रमाणात भासली. सिकल सेल नसलेल्या सुमारे सात टक्के गर्भवतींना रक्ताची तर ०.५ टक्के गर्भवतींना कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासली. सिकल सेलग्रस्त महिलांमध्ये मात्र सुमारे २५ टक्के महिलांना रक्ताची तर सुमारे ६ टक्के महिलांना कृत्रिम श्वासनयंत्रणेची आवश्यकता भासली.

लस घेणे आवश्यक

‘राज्यात आणि देशात सिकल सेलचे प्रमाण जास्त आढळून येणाऱ्या भागातील गर्भवती महिलांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे गर्भवती महिलांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. तसेच आरोग्य यंत्रणेनेदेखील नियमित रक्तपुरवठा, औषधे, नियमित तपासणी, जोखमीच्या गर्भवतींना वरिष्ठ स्तरावर उपचारासाठी तातडीने पाठविणे गरजचे आहे’, असे या अभ्यासाचे लेखक आणि एनआयआरआरएचचे संशोधक डॉ. राहुल गजभिये यांनी सांगितले.