Siddhivinayak Temple : मुंबईतल्या प्रभादेवी या ठिकाणी असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. नवसाला पावणारा गणपती अशी सिद्धिविनायकाची ख्याती आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश करण्यासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तोकड्या कपड्यांमध्ये असलेल्या कुठल्याही भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढच्या आठवड्यापासून ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाविकांच्या काही तक्रारीही आल्या होत्या, ज्यानंतर घेण्यात आला निर्णय

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतो आहे अशा काही तक्रारी सातत्याने मंदिर प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळेच सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचं मत मांडलं होतं. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून ( Siddhivinayak Temple ) स्पष्ट करण्यात आलं आहे.

कुणालाही संकोच वाटेल असा पेहराव करु नये-मंदिर प्रशासन

सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) येणाऱ्या भाविकाचा पेहराव हा मंदिराचं पावित्र्य जपणारा असला पाहिजे, त्या पेहरावामुळे कुणालाही संकोच वाटू नये. अशा प्रकारचा पेहराव कुणी केला तर त्या भाविकाला मंदिर ( Siddhivinayak Temple ) न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी. याचाच अर्थ मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल अशा कपड्यांवर आणि तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे असं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई</strong>
हे मंदिर मुंबई, महाराष्ट्र येथे आहे आणि गणेशभक्तांमध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना 1801 मध्ये झाली असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. बॉलीवूडपासून ते राजकीय जगतातील सेलिब्रिटीही येथे नियमितपणे भेट देण्यासाठी येतात. (छायाचित्र स्रोत: siddhivinayak.org)

काय आहे नियमावली?

सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी योग्य अंगभर कपडे परिधान करुन मंदिरात प्रवेश करावा.

भाविकांचा पेहराव हा मंदिराचं पावित्र्य राखणारा असला पाहिजे.

शॉर्ट्स, शॉर्ट स्कर्ट, अंग प्रदर्शन कपडे करणारे कपडे किंवा तोकडे कपडे घातलेल्या भाविकांनी मंदिरात प्रवेश करु नये, त्यांना अशा कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

भारतीय संस्कृतीला साजेसे कपडे परिधान करुनच मंदिरात प्रवेश करावा. कुठलेही अशोभनीय कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये.

गणेश जयंती निमित्ताने रथ शोभायात्रा

मुंबईतल्या प्रभादेवी भागात सिद्धिविनायक मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी रोज हजारो भाविक येत असतात. आता पुढील आठवड्यापासून या मंदिरासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी गणेश जन्म होणार आहे त्यानिमित्ताने रथ शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा सिद्धिविनायक मंदिर, एस. के. बोले मार्ग ते गोखले मार्ग, पोर्तुगिज चर्च, दादर पोलीस स्टेशन, जाखादेवी चौक, सयानी रोड, शंकर घाणेकर मार्ग, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी मंदिर, नवीन प्रभादेवी मार्ग ते प्रभादेवी मंदिराच्या बाजूने वीर सावरकर मार्ग त्यानंतर पुन्हा सिद्धिविनायक गणपती मंदिर असा मार्ग असणार आहे. ४ फेब्रुवारीला हवन केलं जाणार आहे अशीही माहिती देण्यात आली आहे. द रिपब्लिक ने हे वृत्त दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhivinayak temple bans inappropriate clothes implements dress code guidelines here scj