Siddhivinayak Temple’s Prasad : आंध्र प्रदेशच्या प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी सापडल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. यावरून राज्य सरकारने आधीच्या सरकारवर ताशेरे ओढले. तर, अनेक भक्तांनीही यावर संताप व्यक्त केलाय. दरम्यान, आता सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाबाबत असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओतील दावा मंदिर प्रशासनाने खोडून काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. या मंदिरात जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थीलाही भाविकांची मोठी गर्दी तेथे असते. पायी चालत मंदिरापर्यंत येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

हेही वाचा >> Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिमध्ये एका ट्रेमध्ये सीलपॅक असलेले लाडू आहेत. परंतु, त्यातील एका पॅकमध्ये उंदरांची पिल्ले दिसत आहेत. हा प्रसाद मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे मुंबईकरांनीही संताप व्यक्त केला.

मंदिर प्रशासनाचं म्हणणं काय?

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या व्हिडिओतील दावा फोटाळून लावला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नसल्याचं त्यांनी म्हटलंय. ANI ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “प्रसाद जिथे तयार केला जातो, ती जागा अत्यंत स्वच्छ असते. परिसर स्वच्छ ठेवण्याकरता आम्ही खूप प्रयत्न करतो. या प्रसादातील तूप, काजू मुंबई महानगर पालिकेच्या लॅबमध्ये टेस्ट करून आल्यावरच वापरतो. यासाठी वापरण्यात येणारं पाण्याचंही परिक्षण केलं जातं. जो प्रसाद आम्ही भक्तांना देतो, तो फार शुद्ध आहे ना याकडे आमचं लक्ष असतं. गेल्या दोन दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुठला आहे हे सध्या कळत नाहीय. पण याप्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. पण हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातील नाही.”

दरम्यान, या मंदिर प्रशासनाच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर होते. गेल्यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे आमदार आहेत. गेल्यावर्षी प्रभादेवी येथे गणेशोत्सवात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला होता. तेव्हा सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. पण, चौकशीनंतर सरवणकर यांना क्लिन चिट मिळाली होती. याच प्रकरणामुळे सरवणकर यांचं मंत्रीपद हुकल्याची चर्चा होती.