सिद्धिविनायक मंदिराकडून हजारो रुग्णांना आधार!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून त्या तुलनेत डायलिसिसच्या खर्चीक सेवेचा विस्तार म्हणावा तसा होत नाही. दादर येथील श्री सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाने या रुग्णांना हात देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सिद्धिविनायक मंदिराकडून सुरू असलेली डायलिसिस सेवा तीन पाळ्यांमध्ये करण्याबरोबरच राज्य शासन अथवा महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात जागा दिल्यास नवीन शंभर डायलिसिस मशीन सिद्धिविनायक मंदिराच्याच माध्यमातून सुरू करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

दादरच्या सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. शिवाय मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना डायलिसिस सेवेची असलेली गरज लक्षात घेऊन वीरा देसाई जैन संस्थेच्या सहकार्याने सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी असलेल्या प्रतीक्षालय या मंदिराच्या जागेत सध्या २२ डायलिसिस मशीनच्या साहाय्याने दोन पाळ्यांमध्ये ४४ रुग्णांना अवघ्या २५० रुपयांमध्ये डायलिसिस सेवा दिली जाते. २०१३ सालापासून सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाकडून २२ मशीनच्या माध्यमातून आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक वेळा रुग्णांचे डायलिसिस केले असून यासाठी मंदिराने सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत. गेली चार वर्षे, वर्षांकाठी सुमारे अकरा हजार डायलिसिस केली जातात, असे  विश्वस्त मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी सांगितले.  खासगी रुग्णालयात एक वेळच्या डायलिसीससाठी बाराशे ते सोळाशे रुपये आकारण्यात येतात.

मुंबई महापालिकेकडे दहा हजार चौरस फूट जागा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही १०० डायलिसिस मशीन सुरू करून रुग्णांना मोठा दिलासा देऊ शकतो. तीन रुग्णालयांमध्ये जागा मिळण्यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार सुरू आहे. शासनाच्या जे.जे. रुग्णालयात पाच हजार चौरस फुटांची जागा मिळाल्यास पन्नास डायलिसिस मशीन सुरू करण्याचा आमचा मानस आहे.

– आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर