मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी काल (शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खबळबळ उडाली घडामोडींना वेग आला व रात्री आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. शिवाय अनेक आंदोलक कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.
याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २३ महिला आहेत. “अटकेच्या कोणत्याही प्रक्रियेचं पालन न करता मला अतिरेक्यासारखं पोलीस स्टेशनला आणलं. माझ्या जीवाला धोका आहे. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे माझा खून होऊ शकतो. माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली आहे,” असं गुणरत्न सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल म्हणाले होते. त्यांनतर आता सदावर्ते यांना मुंबईत किला कोर्टात आणलं असून सुनावणी सुरू आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात ज्या त्रूटी दिसून आलेल्या आहेत. त्या संदर्भात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटली यांनी स्पष्ट केलं आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावतानाच, न्यायालयाने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. १०९ आंदोलकांचा जामीन तूर्तास नाकारला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ एप्रिलपर्यंत सदावर्ते पोलीस कोठडीत असतील. तर अन्य १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वकील गुणरत्न सदावर्तेंना मुंबईतील किला कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी काल निदर्शने केल्यानंतर गृह विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
आजच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सकाळापासूनच किला कोर्टाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आता थोड्याच वेळात निकालाचे वाचन होणार आहे.
तिन्ही बाजूचा युक्तीवाद आता पूर्ण झाला आहे. न्यायाधीश कैलाश सावंत हे थोड्याच वेळात निकालाचं वाचन करणार आहेत.
शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व १०३ आरोपींना आज एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले.
काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
राज्याचे परिहनमंत्री अनिल परब यांना आज आंदोनलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना सूचक इशारा दिला. “कुणाच्या तरी भडकवण्यावरून जर कोणी कायदा हातात घेत असेल तर राज्य शासन हातावर हात ठेवून बसणार नाही.” असं ते म्हणाले आहेत.
ST Agitation : “कर्मचारी कायदा हातात घेऊन राज्य शासनावर दबाव टाकत असतील तर…”
वकील गुणरत्न सदावर्तेंना यांना ताब्यात घेताना नोटीस देण्यात आलेली नाही असे त्यांचे वकील वासवानी यांनी न्यायालयास सांगितलं आहे.
वकील गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली जावी, त्यांच्यावरील कलम गंभीर आहेत. अशी मागणी सरकारी वकील घरत यांनी न्यायालयात केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने महेश वासवानी, घनश्याम उपाध्याय आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील हे कोर्टात युक्तीवाद करत आहेत.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईतील किला कोर्टात आणल्यानंतर सुनावणी सुरू आहे. त्यांना जामीन मिळणार की कोठडी याकडे सर्वांचे लक्ष आहे
गुणरत्न सदावर्ते किला कोर्टात दाखल, पत्नी जयश्री पाटील आणि वकील प्रदीप घरत किला कोर्टात पोहोचले असून सुनावणी सुरू आहे.