सुप्रसिद्ध पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून ‘माई’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ दोन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आला. परंतु, आशा भोसले यांच्या कन्येने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याचबरोबर चित्रपट प्रदर्शित केव्हा करावा याविषयी निर्मात्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाल्याने आता ‘माई’ हा हिंदी चित्रपट पुढील वर्षीच प्रदर्शित केला जाणार आहे. दिग्दर्शक महेश कोडियाल म्हणाले की, या वर्षअखेर चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार केला जात होता. परंतु, बडय़ा बॅनरचे अनेक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत असून त्यामुळेच ‘माई’ आता पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer asha bhosle act in movie maae will realse in next year