अभिषेक तेली, लोकसत्ता

मुंबई : सारेगमप लिटल चॅम्प्समधून आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे टॉप ५ स्पर्धक महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचले. सध्या हे पाचही जण संगीत क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी झेप घेत आहेत. विविध ठिकाणी गायन कला सादर करीत असताना मुग्धा वैशंपायन हिने स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभात आज मुग्धा वैशंपायनला हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.

Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

गायिका मुग्धा वैशंपायन हिने मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून शैक्षणिक वर्ष २०२१-२३ अंतर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आणि सर्वाधिक गुण प्राप्त करीत दिवंगत श्री रंजनकुमार एच. वैद्य सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मुग्धाची अंतिम परीक्षा एप्रिल – २०२३ मध्ये पार पडली होती. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभ बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती व राज्यपाल रमेश बैस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुग्धा वैशंपायन हिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी मुग्धाचे आई – वडीलही उपस्थित होते. मुग्धाला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आल्यानंतर तिच्या आई – वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेकांनी तिचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले, तर काहींना तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

आणखी वाचा-मुंबई : केंद्रीय मार्डच्या संपापासून बीएमसी ‘मार्ड’ दूर

मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळाल्याचा प्रचंड आनंद असून हा माझ्या आयुष्यातील एक अभिमानास्पद आणि अविस्मरणीय क्षण आहे. वेगवेगळ्या ठिकाणी गायन कला सादर करण्याची संधी मिळते किंवा वेगवेगळे पुरस्कार मिळतात. परंतु विशेषतः मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यामध्ये सुवर्णपदक प्राप्त करणे ही माझ्यासाठी खरोखर आनंदाची, अभिमानाची आणि अवर्णनीय गोष्ट आहे, अशी भावना मुग्धा वैशंपायन हिने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठातून मुग्धाला भारतीय शास्त्रीय संगीतात सुवर्ण पदक मिळाले, याचा विशेष आनंद आहे. या यशामध्ये तिची खूप मेहनत आहे, तसेच तिच्या गुरु विदुषी शुभदा पराडकर आणि सर्व प्राध्यापकांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून त्यांच्या मदतीमुळे तिला हे यश प्राप्त झाले. यापुढेही ती शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार करण्यात सहभागी होईल. हा सर्वोत्तम संगीत प्रकार जगाच्या व भारताच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी व या संगीत प्रकाराबाबत सर्वांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी ती प्रयत्नशील असेल, अशी भावना मुग्धा वैशंपायन हिचे वडील भगवान वैशंपायन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

आणखी वाचा-मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

तारेवरची कसरत होती, पण शिकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आनंद घेतला

एकाचवेळी सर्व गोष्टी जुळवून आणणे, ही खरोखर तारेवरची कसरत आहे. कारण कलाकार म्हटले की, सतत विविध गोष्टी, कार्यक्रम व दौरे सुरू असतात. यामधून मला जितके शक्य झाले, तितकी मी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात हजेरी लावली. हजेरीला खूप महत्त्व असून पदव्युतरच्या दोन्ही वर्षात मी ८० टक्के हजेरी लावली आणि शिकण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेचा मी आनंद घेतला. आपण गाणे गात असतो, एखादा राग मांडत असतो. पण शास्त्रीय संगीत हे इतके मोठे आहे की शास्त्रीय संगीत सादर करताना जसा मोकळेपणा आहे. तितकाच बंधिस्तपणा, चलन व शिस्त आहे. ती शिस्त सांभाळून शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी कसब लागते. गाणे प्रत्यक्षपपणे सादर करणे व त्याच्या थेअरीचा सुद्धा अभ्यास करणे, हे खूप अवघड असते आणि त्यासाठी मला मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षकांचे, मार्गदर्शकांचे व माझ्या गुरू ग्वाल्हेर आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी शुभदा पराडकर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे आई – बाबा, त्यांच्याशिवाय हे यश शक्य नाही. आई – बाबांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे मी हे सर्व करू शकले, याचा सर्वात जास्त आनंद आहे, असेही मुग्धा वैशंपायन म्हणाली.