टायटल पार्टनर ‘लोकसत्ता’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गायिका वैशाली सामंत यांच्या गाण्यांची मैफल अर्थात ‘अनप्लग्ड मराठी लाईव्ह-वैशाली सामंत’ येत्या २ जून रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा ‘टायटल पार्टनर’ ‘लोकसत्ता’ आहे. कार्यक्रमात वैशाली सामंत त्यांची लोकप्रिय गाणी सादर करणार आहेत पण त्याच बरोबर काही नवीन गाणीही त्या पहिल्यांदा श्रोत्यांसमोर म्हणणार आहेत.
त्यांच्यासोबत या संगीत मैफलीत गीतकार अश्विनी शेंडे, गायक जयदीप बगावकर, दिग्दर्शक केदार शिंदे हे मान्यवरही सहभागी होणार आहेत. कमलेश भडकमकर यांनी संगीत संयोजन केले असून संगीतकार अविनाश-विश्वजित यांचेही सादरीकरण असणार आहे. आरके स्वामी हन्सा समुहाचा भाग असलेल्या हन्सा इव्हेंटने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
‘अनप्लग्ड मराठी लाईव्ह’ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात होणार असून त्याची सुरुवात मुंबईतून होत आहे. ‘अनप्लग्ड मराठी लाईव्ह’वैशाली सामंत हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे होणार आहे. कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शो आणि नाटय़ मंदिरात उपलप्ध आहेत.