म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार असून गुरुवार, ५ जानेवारीपासून नोंदणीस सुरुवात होणार आहे.म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे सोडतीत विजयी होणाऱ्याला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येईल.

म्हाडाच्या घरासाठी आता एकच कायमस्वरूपी नोंदणी करावी लागेल. कोणीही इच्छुक आता नोंदणी करू शकतो. एखाद्याला ज्या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे ती जाहीर झाल्यानंतर त्याला अर्ज करता येईल. या नोंदणीचा प्रारंभ गुरुवारपासून होणार असल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी याला दुजोरा दिला आहे.

rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
cet Chamber extends bed med application deadline students can apply until February 18 2025
बीएड, एमएड अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ, १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
mhada announces lottery for 493 nashik mandal houses applications accepted until march 7
म्हाडा नाशिक मंडळाच्या ४९३ घरांच्या अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात, ७ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार
Application registration deadline for five-year law course extended
विधि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
BJP member registration deadline has passed but not even half of target has been met
भाजप सदस्य नोंदणी! ‘तारीख पे तारीख’ सदस्य जुळता जुळेना

नोंदणी अशी.. एकाच कायमस्वरूपी नोंदणीस गुरुवार, ५ जानेवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. नव्या बदलानुसार, आता नोंदणी करतानाच इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. सामाजिक आणि इतर आरक्षित गटांतील इच्छुकांना संबंधित प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Story img Loader