पुणे येथील ‘सिंहगड टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिटय़ूट’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील अध्यापकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याचे प्रकरण गाजत असतानाच आता या संस्थेने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे तब्बल ४५ कोटी रुपये थकविल्याचेही उघडकीस आले आहे. या संस्थेने ४५ कोटी रुपये थकविले असून संस्थेच्या आमच्याकडे गहाण ठेवलेल्या जागांच्या खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार करू नये, असा जाहीर इशारा स्टेट बँकेने दिला आहे. सिंहगड संस्थेने स्टेट बँकेप्रमाणेच ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चेही ३८ कोटी ४१ लाख रुपये थकविल्यामुळे त्यांनी संस्थेच्या मावळ तालुक्यातील जागांवर जप्तीची नोटीसही बजावली होती. या पाश्र्वभूमीवर संस्थेची नेमकी स्थिती संस्थेचे प्रमुख मारुती नवले यांनी स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी येथील काही अध्यापकांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांत सिंहगड टेक्निकल संस्थेच्या वारजे, नऱ्हे, वडगाव तसेच लोणावळा येथील अभियांत्रिकी तसेच अन्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना नियमित वेतनही मिळत नव्हते. संस्थेच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढण्यात येऊन त्याचीही परतफेड होत नसल्याच्या तक्रारी संबंधितांकडून करण्यात येत होत्या. येथील एक अध्यापक शिंदे यांनी वेतनाच्या प्रश्नावर आवाज उठविल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता संस्थेने वेगवेगळ्या बँकांकडून मोठय़ा प्रमाणात कर्जे घेतली असून त्याची परतफेड करण्यात संस्था अपयशी ठरत असल्याचे उघडकीस येऊ लागल्यामुळे बँकांकडून नेमकी कोणत्या कारणांसाठी कर्जे घेण्यात आली व त्याचा वापर नेमका कोठे केला गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार

स्टेट बँकेकडून घेतलेल्या ४५ कोटी रुपयांच्या कर्जाला हमीदार म्हणून संस्थेचे प्रमुख प्राध्यापक मारुती नवले व त्यांच्या पत्नी सुनंदा मारुती नवले या जबाबदार असून कर्जासाठी संस्थेची पुणे हवेली येथील नऱ्हे कॅम्पस, फेज १ येथील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या नावे असलेल्या १९,५८७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मालमत्तेवरील उभ्या असलेल्या इमारती, शेड, गोडाऊन तसेच निर्माण करावयाच्या इमारत संरचना याबाबत बँकेच्या लेखी संमतीशिवाय कोणताही व्यवहार करू नये, अशी जाहीर सूचना देणारी जाहिरातच बँकेने प्रसिद्ध केली आहे.

ही वेळ का आली?

सिंहगड संस्थेची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे तसेच नेमक्या कोणत्या कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आणि यातून संस्था कशा प्रकारे मार्ग काढणार, हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत संस्थेचे प्रमुख मारुती नवले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

 

Story img Loader