मुंबई : मध्य रेल्वे प्राधिकरणाने शीव पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे, शीव उड्डाणपुलावरून अवजड वाहनांसह २.८० मीटरहून अधिक उंचीच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मोहरमनिमित्त १७ जुलै रोजी वांद्रे, कुर्ला, धारावीसह अन्य भागातून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित भागात नागरिकांची मोठी वर्दळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या भागातील मार्गांवरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> महापालिकेच्या शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा; निविदा प्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे शैक्षणिक साहित्य विलंबाने, काँग्रेस पक्षाचा आरोप

ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

मोहरमनिमित्ताने दरवर्षी माहीम रेती बंदर येथे ताजिया विसर्जित करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतात. यंदाही अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याने काही मार्गावर गर्दी होऊ शकते. त्यामुळे, नागरिकांनी बुधवार, १७ जुलै रोजी दुपारी ४ ते गुरूवार, १८ जुलै रोजी पहाटे ४ या कालावधीत जी उत्तर विभागातील टी जंक्शन ते कला नगर, ६० फूट रस्ता, ९० फूट रस्ता, एस. एल. रहेजा मार्ग, माहीम कॉज वे या मार्गावरून प्रवास करणे शक्यतो टाळावे. तसेच, महानगरपालिका, मुंबई पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.