काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केलेल्या तपासाचा अहवाल मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मोहोरबंद स्वरूपात हा तपास अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने दिली.
गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ला तपास पूर्ण करण्यासाठी आठ आठवडय़ांचा वेळ दिला होता. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना या तपासावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी कृपाशंकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. राज्य सरकारनेही ‘एसआयटी’च्या तपासाबाबतचे दोन अहवाल यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १३ मार्च रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता करणाऱ्या अहवालासोबत ‘एसआयटी’च्या तपासाबाबतचा पहिला अहवाल सरकारने १६ एप्रिल रोजी न्यायालयात सादर केला होता.
कृपाशंकर यांचे बेहिशेबी मालमत्ता प्रकरण :‘एसआयटी’चा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केलेल्या तपासाचा अहवाल मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मोहोरबंद स्वरूपात हा तपास अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ला तपास पूर्ण
First published on: 05-02-2013 at 04:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sit report has present in supreme court of krupashankar singh