काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केलेल्या तपासाचा अहवाल मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मोहोरबंद स्वरूपात हा तपास अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने दिली.
गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ला तपास पूर्ण करण्यासाठी आठ आठवडय़ांचा वेळ दिला होता. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना या तपासावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी कृपाशंकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. राज्य सरकारनेही ‘एसआयटी’च्या तपासाबाबतचे दोन अहवाल यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १३ मार्च रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता करणाऱ्या अहवालासोबत ‘एसआयटी’च्या तपासाबाबतचा पहिला अहवाल सरकारने १६ एप्रिल रोजी न्यायालयात सादर केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा