ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल या वर्षीचा ‘सीताराम जिंदाल फाऊंडेशन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून ३ डिसेंबरला नवी दिल्ली येथे डॉ. भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना अथवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षी हा पुरस्कार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मिळाला होता.    

Story img Loader