मध्य रेल्वेच्या वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू पावणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून गुरुवारी सकाळी ९ ते ११ या दोन तासांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जण लोकलमधून  पडले. या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी आहेत.
मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात राहणारा शिवाजी वाघमारे (२५) हा तरुण पारसिक बोगद्याजवळ लोकलमधून पडून गंभीर जखमी झाला. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा तरुण टेम्पोचालक म्हणून व्यवसाय करत होता. दुसऱ्या घटनेत, एका लोकलमधून तीन प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ गाडीतून खाली पडले. यामध्ये दोन महिला व खातीर अब्दुल माजीद (२५) या प्रवाशांचा समावेश आहे. मात्र या महिलांना नेमके कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे नव्हती. तर तिसऱ्या घटनेत मुंब्रा स्थानकात कल्याण दिशेकडे मेहसान शेख हा तरुण पडून जखमी झाला. तर रात्री उशिरा आणखी एक तरुण गर्दीमुळे पडून जखमी झाला.

Story img Loader