उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांना १ एप्रिलपासून सहामाही आणि वार्षिक पास मिळणार असून पुढील आठवडय़ापासून ते उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. सहामाही आणि वार्षिक पासामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. मात्र ‘इज्जत पास’ किंवा विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सवलत पास सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात मिळणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मासिक पासाच्या ५.४ पटीमध्ये सहामाही तर १०.८ पट वार्षिक पास असेल.

Story img Loader