लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईक २०० ग्रॅम मेफेड्रॉन हे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या अंमलीपदार्थाची किंमत सुमारे ४१ लाख रुपये असून सर्व आरोपींविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Dhankawadi gambling den, Raid on gambling den,
पुणे : धनकवडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहाजणांविरुद्ध गुन्हा
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Baba Siddique murder case, Five people in police custody, Baba Siddique news, Baba Siddique latest news,
पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

मुंबई शहरातील अंमलीपदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणाऱ्या इसमांचा अंमलीपदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटचे पथक शोध घेत असून कुर्ला स्ट्रीट, मस्जीद बंदर (पूर्व) येथे तीन व्यक्ती संशयास्पदरित्या काही तरी एकमेकांमध्ये देवाण-घेवाण करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने या तिघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे ९३ ग्रॅम मेफेड्रॉन सापडले.

आणखी वाचा-मुंबई: बँकेशी साधर्म्य असलेल्या मोबाइल ॲपद्वारे सायबर फसवणूक?

आरोपींची चौकशी केली असता त्यांनी अंमलीपदार्थ पुरवणाऱ्या व्यक्तींची माहिती पथकाला दिली. त्याद्वारे अन्य तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १११ ग्रॅम मेफेड्रॉन व रोख १५ हजार रुपये जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ४० लाख ८० हजार रुपये आहे. सर्व आरोपींविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी सराईत असून त्यातील एकाविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होता. याप्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी पथक अधिक तपास करीत आहे.