मुंबईतील मुलुंड परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमुळे मुलुंडमध्ये बिबट्या शिरला ही बातमी समोर आली. इतकेच नाही तर या बिबट्याने एकूण पाच जणांवर हल्ला चढवला. ही बाब कळताच जखमी रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता याच बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. आज सकाळीच ही बातमी समजताच भाजपच्या किरीट सोमय्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील रहिवाशी गणेश पुजारी यांच्या घरात हा बिबट्या लपून बसला होता. वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस या सगळ्यांनी अथक प्रयत्न करून या बिबट्याला आता जेरबंद केले.

सकाळी या घटनेची माहिती मिळताच भाजप खासदार किरीट सोमय्या तिथे पोहचले. तिथे त्यांनी पोलीस, जखमी माणसे यांच्यासोबत सेल्फी काढण्यातच धन्यता मानली. त्यांच्या या सेल्फी प्रेमाला काय म्हणावे? हा प्रश्न रहिवाशांनाही निश्चित पडला असेलच. मुलुंड पूर्वेला असलेल्या नानेपाडा भागात बिबट्या शिरण्याची घटना घडली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी या बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते. ज्यांच्या प्रयत्नांना यश आले असून तीन तासांनी बिबट्या जेरबंद झाला आहे.

 

 

मुलुंड आणि भांडुप पश्चिमेचा काही भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भिंतीला लागून आहे. त्या भिंतीवरून अनेकदा वन्यप्राणी लोकवस्तीत शिरतात. आज मुलुंड पूर्व भागात बिबट्याने प्रवेश केला आणि पाचजणांना जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जणांवर शीव रूग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. बिबट्या लोकवस्तीत शिरल्याची माहिती मिळताच लोकांनी गर्दी केली होती. तसेच बिबट्याला जेरबंद केल्यावर लोकां उपचारनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

Story img Loader