मुंबईतील मुलुंड परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमुळे मुलुंडमध्ये बिबट्या शिरला ही बातमी समोर आली. इतकेच नाही तर या बिबट्याने एकूण पाच जणांवर हल्ला चढवला. ही बाब कळताच जखमी रूग्णांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता याच बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. आज सकाळीच ही बातमी समजताच भाजपच्या किरीट सोमय्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील रहिवाशी गणेश पुजारी यांच्या घरात हा बिबट्या लपून बसला होता. वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस या सगळ्यांनी अथक प्रयत्न करून या बिबट्याला आता जेरबंद केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा