मुंबई : रविवारी सायंकाळी जुहू चौपाटी येथे सहा पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्यामुळे सहा जणांना रुग्णालयात दाखल करावे करावे लागले. त्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या सहा जणांना जेलीफिशचा दंश झाला. त्रास होऊ लागल्यामुळे या सहा जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेहताब शेख(२०), दिक्षाद मेहता (५), महम्मद अहर मन्सूरी (साडेचार वर्ष), मेटविश शेख (६), मोहम्मद रजाउल्लाह (२२) , आर्थिया (२६) अशी या सहा जणांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा