महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जुलै २०१५ ते जानेवारी २०१६ या सात महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी मे महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी केली.
या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ११९ टक्के इतका होणार आहे. तसेच सात महिन्यांच्या महागाई भत्त्याच्या थकबाकीपोटी अंदाजे ४२ कोटींचा अतिरिक्त भार महामंडळावर पडणार आहे. १ लाख ६ हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल.विधिमंडळात केलेल्या घोषणेप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात अभ्यासपूर्ण सुधारणा करण्यासाठी सेवानिवृत्त मुख्य वन संरक्षक डी. आर. परिहार यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधार समिती नेमण्याची घोषणाही रावते यांनी केली.

* समिती एसटी महामंडळातील श्रेणीनिहाय कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वेतनाचा अभ्यास करणार आहे.
* सुधारित वेतनश्रेणी कशी असावी, याबाबत आपला अहवाल चार महिन्यांत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे सादर करतील.

Story img Loader