या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने राज्यात सहा ठिकाणी सुसज्ज कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याची योजना आखली आहे. औरंगाबाद नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिटय़ूट’ उभारण्यात येणार असून यासाठी पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय अकोला, पुणे, सांगली व मुंबईतील कामा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी विशेष सुविधा उभारण्यात येणार आहेत.

कधी होणार?

राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून कॅन्सर रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाकडे धाव घेतात. टाटा रुग्णालयावर पडणारा भार व राज्यातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन विभागीय स्तरावर अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र स्थापन करण्याची योजना आखण्यात आली असून त्याअंतर्गतच औरंगाबाद, पुणे, नागपूर, अकोला व सांगली येथे कॅन्सर रुग्णालये उभारण्याचे काम सुरू केल्याचे गिरीश महाजन म्हणाले. मुंबईतील कामा रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करतानाच येथे पन्नास खाटांचे केमोथेरपी सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तीस कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून याच ठिकाणी अत्याधुनिक कर्करोग निदान केंद्रही सुरू करण्याची योजना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मांडली आहे.

सीएसआर निधी अथवा शासनाच्या मदतीने आठ कोटी रुपयांचे हे सुसज्ज निदान केंद्र सुरू करण्याची योजना असून आगामी दोन वर्षांत ही सर्व केंद्रे संपूर्ण क्षमतेने सुरू केली जातील, असे महाजन यांनी सांगितले.