घाटकोपर रेल्वेस्थानकाकडून (पश्चिम) अमृत नगर येथे जाणाऱ्या बेस्टच्या ४१६ क्रमांकाच्या बसला शुक्रवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक तसेच सात प्रवासीही जखमी झाले. या सातपैकी चार प्रवासी बेस्टचेच कर्मचारी आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
४१६ क्रमांकाची ही बस घाटकोपर येथील सवरेदय नगरच्या वळणावर उभी होती. त्या वेळी विक्रोळीहून घाटकोपरच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकने या बसला पुढून जोरदार धडक दिली. सकाळी सातच्या सुमारास झालेल्या या अपघातात बेस्टचा चालक भरत घाडी, वाहक भरत कोंडे हे दोघेही गंभीर जखमी झाले. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये फक्त सात प्रवासी होते. यापैकी बेस्टचे आणखी दोन चालक जीवन लगस आणि भागवत मैदाद, सुरक्षा रक्षक जे. सी. कोकाटे आणि एक वाहक संतोष छन्न्ो यांनाही दुखापत झाली. या सर्वाना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा