मालाड येथे सहा वर्षांच्या मुलीवर नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून २९ वर्षीय आरोपीला अटक केली. मालाड परिसरातील झोपु योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीत ८ जानेवारी रोजी हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वांद्रे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

आरोपी एका घरगुती कार्यक्रमासाठी पीडित मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी उद््वाहनाच्या शेजारील मोकळ्या जागेत नेऊन पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला असता तिने मालाड पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.