धारावी येथून शनिवारी अपहरण झालेल्या ७ महिन्यांच्या गौरव जैस्वालचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिसांनी अपहरणकर्त्यांचे रेखाचित्र बनविले असून त्याचा शोध सुरू आहे.
धारावीच्या नाईक नगर येथील खोब्रा लेनमध्ये राहणारा सौरभ हा मुलगा आपल्या दोन मित्रांसह बॅडमिंटन खेळत होता. त्याचा ७ महिन्यांचा लहान भाऊ गौरव तेथेच खेळत होता. त्यावेळी एका इसमाने सौरभला बॅडमिंटनचे शटलकॉक आणण्यासाठी पाठवले. सौरभ तेथून गेल्यावर त्या इसमाने पटकन गौरवला उचलून पळ काढला. त्या मुलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी  आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. या अपहरणकर्त्यांचे वय पस्तीस ते चाळीस दरम्यान असून त्याने हिरव्या रंगाचा शर्ट आणि जीन्स पँट घातली होती असे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.